ब्रेकिंग एज्युकेशन न्यूज

यशस्वी संस्थेच्या वतीने राष्ट्रीय युवक दिन उत्साहात साजरा.

Edunews नेटवर्क

पिंपरी, दिनांक 12 जानेवारी 2026 :

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स ( आय आय एम एस) च्या चिंचवड येथील संकुलात राष्ट्रीय युवक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात विवेकानंद केंद्र कन्याकुमारी च्या चिंचवड शाखेच्या वतीने यावेळी डॉ.नचिकेत देशमुख यांचे ‘युवकांसाठी जीवन कौशल्य’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ.नचिकेत देशमुख म्हणाले की, युवकांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रातून प्रेरणा घेऊन नैतिकतेचे अधिष्ठान बाळगत अभिनव वैचारिक दृष्टिकोन विकसित करण्यावर भर द्यावा.प्रचंड वेगाने बदलणाऱ्या सध्याच्या जगात क्रमिक अभ्यासक्रमासोबतच काल सुसंगत तंत्र कौशल्य युवकांनी आत्मसात करायला हवी असेही डॉ.देशमुख म्हणाले.एकाग्रता,निर्भयता,चारित्र्यसंपन्नता आणि सेवा या चतु:सूत्रीचा अवलंब केल्यास युवा वर्गाला सहजगत्या ध्येयप्राप्ती करता येईल असेही डॉ. नचिकेता देशमुख म्हणाले.आयआयएमएस चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button