शैक्षणिक

सायबर सुरक्षेबाबत सर्वांनी दक्षता बाळगणे आवश्यक – डॉ. रोहन न्यायाधीश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व आयबीएमआर यांच्यावतीने आयोजित सायबर सुरक्षा विषयावरील कार्यशाळा संपन्न

edunewspune.com

पुणे : प्रतिनिधी

दिनांक १४ मार्च २०२६ : डिजिटल साधनांचा वापर करताना सायबर सुरक्षेबाबत सर्वांनी दक्षता बाळगणे आवश्यक आहे,असे मत सायबर तज्ञ् डॉ.रोहन न्यायाधीश यांनी व्यक्त केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेन्ट अँड रिसर्च अर्थात आयबीएमआर यांच्यावतीने आयोजित सायबर सुरक्षा विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, समाजमाध्यमांचा वापर करताना कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती देऊ नये,तसेच कायम सजग राहून कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे सांगत मोबाईलचा वापर करताना गरजेपुरत्या ऍप्सचाच वापर करावा आणि सायबर गुन्हा घडल्यास पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा असेही न्यायाधीश यांनी सांगितले यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या व्यवस्थापनशास्त्र संस्थांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि प्राध्यापक वर्ग सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button